Dr-Amol-deshmukh-friendship-day-and-psychology

मैत्री म्हणजे भावनिक उपचार – Friendship Day 2025

डॉ. अमोल देशमुख

“मित्र म्हणजे फक्त वेळ घालवण्यासाठी नाही —
मित्र म्हणजे भावनांची खरी थेरपी!”
आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात – आई-वडील, भाऊ-बहिण, सहकारी, शिक्षक – पण खरे मित्र हे मनाशी मन जोडणारे नाते असते. ते तुमचं काहीही ऐकतात, न शिकवता, न चूक दाखवता – फक्त “असणं” पुरेसं असतं.
हीच उपस्थिती असते नैतिक सपोर्ट थेरपी.

मानसिक आरोग्यात मैत्रीचं स्थान – का इतकं महत्वाचं?

  • खरं बोलायला सुरक्षित जागा मिळते – कोणताही मुखवटा न घालता आपण व्यक्त होतो
  • एकटेपणा दूर होतो – सामाजिक संबंध मेंदूतील ऑक्सिटोसिन वाढवतात
  • भावनांना वाट मोकळी मिळते – रडणं, हसणं, गप्पा हे मेंदूच्या शांतीसाठी अत्यंत आवश्यक
  • स्वतःची ओळख होते – मित्र आपल्याला आरशासारखे बघू देतात
  • नकारात्मक विचारांवर ब्रेक लावता येतो – मित्राचं ‘तु मस्त आहेस’ हे वाक्यही खूप काही बदलू शकतं थोडं अनुभवात्मक उदाहरण:
    “एकदा एका तरुण रुग्णाने मला सांगितलं – ‘सर, औषधं चालू आहेत, पण जेव्हा मी मित्राला मन मोकळं करत बोलतो, तेव्हा एक वेगळीच शांतता मिळते.’
हीच शांतता म्हणजे नैतिक सपोर्ट थेरपी!” वैज्ञानिक आधार:
  • हार्वर्ड विद्यापीठाच्या दीर्घकालीन अभ्यासातून सिद्ध झालं की, strong friendships हे मानसिक आरोग्याचं सर्वात मजबूत संरक्षक कवच आहे.
  • Dopamine आणि Serotonin हे ‘हॅपी हार्मोन्स’ फक्त मेडिटेशनने नाही, तर मैत्रीतल्या संवादातूनही वाढतात. मित्र म्हणजे ‘Free Listening Therapy’
    कधी-कधी आपण काही बोलायला तयार नसतो, पण समोरचा मित्र फक्त “हो, मी आहे” असं सांगतो.
हेच संवाद नसलेलं संवाद असतं.
यात उपचार असतो. थोडे पॉझिटिव्ह सवयी वाढवा:
  • आठवड्यातून एकदा जुन्या मित्राला फोन करा
  • मैत्री टिकवण्यासाठी वेळ काढा – मानसिक आरोग्याचं ते इन्व्हेस्टमेंट आहे
  • सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष भेटी आणि संवाद जास्त प्रभावी ठरतात
  • मित्राला ‘कसं आहेस?’ एवढं विचारणंही थेरपी होऊ शकतं! सल्ला:
    “तुम्ही जर मानसिक थकवा, चिंता किंवा नैराश्य अनुभवत असाल,
तर प्रथम एक विश्वासू मित्राशी बोला.
आणि गरज वाटल्यास, प्रोफेशनल मदतीसाठी संकोच करू नका.
मानसिक आरोग्य हे फक्त तुमचं वैयक्तिक प्रॉब्लेम नाही — ते तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरवतं.” थोडक्यात:
    मित्र म्हणजे केवळ नातं नाही,
ते असतं एक “जीवंत थेरपी रूम!”

Leave a Reply