पावसाळी उदासीनता = रासायनिक बदल… आणि योग्य उपाय!
डॉ. अमोल देशमुख –
ऋतूमानसिक विकार (Seasonal Affective Disorder – SAD) हा एक प्रकारचा नैराश्य विकार (depression) आहे जो विशिष्ट ऋतूमध्ये, विशेषतः हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात होतो आणि उन्हाळा किंवा वसंत ऋतूमध्ये आपोआप कमी होतो.
ही केवळ ‘मूड स्विंग’ नाही –
तर एक वैज्ञानिक, उपचारक्षम स्थिती आहे – जी Seasonal Affective Disorder (SAD) म्हणून ओळखली जाते.
SAD म्हणजे काय?
Seasonal Affective Disorder (ऋतुगत मानसिक उदासीनता) हा डिप्रेशनचा सौम्य प्रकार आहे,
जो हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मेंदूतल्या रसायनांवर परिणाम करून उदासीनता निर्माण करतो.
यामागचं कारण काय?
कमी प्रकाशामुळे सेरोटोनिन (सुखद अनुभव देणारं रसायन) घटतं
मेलाटोनिन वाढतं – यामुळे झोप जास्त लागते आणि उत्साह कमी होतो
शरीराचं नैसर्गिक “मूड रेग्युलेशन सायकल” बिघडतं
लक्षणं – ही इशाराच समजा:
दिवसातील बहुतेक वेळ उदास वाटणं
झोप जास्त लागणे, तरीही थकल्यासारखं वाटणं
चहा-कॉफी-गोड पदार्थांची अनावश्यक गरज
एकांतात राहण्याची इच्छा
कामाची ऊर्जा, संवादाची इच्छा कमी होणे
“काही कारण नाही, पण मनावर ओझं आहे” – अशी भावना
पावसाळी उदासीनतेवर प्रभावी उपाय – योग्य सवयी, योग्य मार्गदर्शन
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या:
जर लक्षणं सातत्याने २ आठवड्यांपेक्षा जास्त जाणवत असतील, तर ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही.
मनोचिकित्सकांचा सल्ला आणि योग्य उपचारांनी ही स्थिती पूर्णपणे सुधारता येते. पावसाळा तुमचं मनही फुलवू शकतो – गरज आहे फक्त योग्य पद्धतीने जगण्याची!
“मन हे आकाशासारखं आहे – ढग येतील, जातील… पण नीळसर शांतता पुन्हा येणारच.”
– डॉ. अमोल देशमुख तज्ज्ञ मदतीचा विश्वास
Antarang Hospital, औरंगाबाद येथे आम्ही Seasonal Depression, चिंता, झोपेच्या समस्या, आणि मानसिक तणावासाठी वैयक्तिकृत उपचार देतो. गोळीवर अवलंबून न राहता – संपूर्ण विचार करून थेरपी, समुपदेशन व आधुनिक मानसिक आरोग्य उपचार
मुलं, प्रौढ व वृद्धांसाठी वेगवेगळा दृष्टिकोन Antarang Hospital – मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती उपचार केंद्र www.DrAmolDeshmukh.com
प्रकाशाचा वापर वाढवा:
प्राकृतिक सूर्यप्रकाशात दररोज 20–30 मिनिटं घालवा.
घरात उजळ, ventilated जागा निवडा.
चालणं, व्यायाम, ध्यान:
हलका व्यायाम, सूर्यनमस्कार, किंवा ध्यान – हे मानसिक ऊर्जा वाढवतात आणि सेरोटोनिन स्त्रावास चालना देतात.
मेंदूस्नेही आहार:
Vitamin D, B12, Omega-3 असलेले पदार्थ (साल्मन, अंडी, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स) यांचा आहारात समावेश करा.
संगीत, संवाद आणि थोडं “Me Time”
आवडती गाणी ऐकणं, आवडती पुस्तकं वाचणं, मित्रांशी संवाद – मनात सकारात्मकता निर्माण करतात.